Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ६१

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ६१


सकाळी गौरवी आरवला म्हणाली…
“आरव… मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे…”

आरव लगेच हातातलं काम बाजूला ठेवतो… तिच्या समोर येऊन शांतपणे बसतो…
“बोल…”
तो मृदू आवाजात म्हणाला…
“मी आहे… तुझ्या पाठिशी… तू बिनधास्त बोल…”

क्षणभर गौरवी गप्प राहते… व आपले श्वास सावरते…
आणि मग ठाम आवाजात म्हणते...
“आरव… मी माधवकडून घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतलाय…”

हे ऐकताच आरव क्षणभर स्तब्ध झाला… त्याच्या डोळ्यांत आश्चर्य होतं… पण चेहऱ्यावर नकळत एक वेगळंच समाधानही झळकत होतं…

जणू तो मनातल्या मनात म्हणत होता...
"शेवटी ती स्वतःसाठी उभी राहतेय… कारण हा निर्णय घेणे सोपा नव्हता…”

गौरवी पुढे म्हणाली…
“पण आता मी फक्त स्वतःसाठी नाही… तर माझ्या बाळासाठीही लढणार आहे…”

आरव हलकेच मान हलवतो… त्याच्या आवाजात आता पूर्ण ठामपणा होता...
“आणि तू बरोबर निर्णय घेतलास…”

गौरवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते…

तेव्हा आरव म्हणतो...
“उद्या ताई येणार आहे… आणि मी तिला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे…”
तो थोडा थांबतो…

मग अभिमानाने पुढे म्हणतो...
“ती नक्की तुला मदत करेल… कारण ती फक्त माझी ताई नाही… तर ती एक चांगली वकील आहे…”

गौरवीच्या डोळ्यांत
पहिल्यांदाच आशेची झलक दिसते…
ती हळूच म्हणते...
“आरव… मला पुन्हा उभं राहायचं आहे…”

आरव शांतपणे तिच्याकडे पाहतो… आणि ठाम शब्दांत म्हणतो...
“आणि यावेळी कोणालाही तुला पाडू देणार नाही…”

त्या क्षणी गौरवीला जाणवलं... तिचा संघर्ष अजून संपलेला नाही… पण आता ती एकटी मात्र नक्कीच नव्हती…

दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजते…
आरव दार उघडतो… तर समोर उभी असते...
आसावरी… त्याची मोठी ताई...

आसावरी... डोळ्यांत आत्मविश्वास… चेहऱ्यावर गंभीर शांतता… आणि हातात एक बॅग…

“आरु… कसा आहेस रे...?”
ती हलकंसं हसून म्हणते…

"मी मस्त आहे..." आरव...

"ते दिसत आहे... मस्त गोलमटोल झालास..." आसावरी हसत बोलते...

त्यानंतर ती सोफ्यावर बसत आरवला विचारते...
“कुठे आहे ती…?”

आरव बाजूला सरकतो…
“आत स्वयंपाक घरात आहे ताई…”

आसावरी आत स्वयंपाक घरात येते… आणि तिची नजर थेट गौरवीवर स्थिरावते…

क्षणभर काहीच बोलत नाही… फक्त त्या नजरेत सगळं समजून घेतल्यासारखं वाटतं…

गौरवी थोडी गोंधळलेली… आणि थोडी घाबरलेली दिसते…

पण आसावरी पुढे येऊन अगदी साध्या आणि प्रेमळ आवाजात म्हणते...
“मी आसावरी… आरवची मोठी बहीण… कशी आहेस...?"

गौरवी मान हलवून बोलते...
"मी बरी आहे ताई..."

त्यानंतर ती गौरवीला नाश्ता बनवण्यासाठी मदत करते... गौरवी तीला अडविण्याचा खुप प्रयत्न करते... पण आसावरी काही ऐकत नाही...

त्यानंतर आसावरी फ्रेश होऊन येते... आणि मग तीघंही बाल्कनीत चहा नाश्ता करून घेतात...

आसावरी बोलायला सुरुवात करते...
“तुला माहिती झाले असेल कि… मी एक वकील आहे ते…"

गौरवी होकारार्थी मान हलवत बोलत...
"हो..."

"मी एक वकील जरुर आहे पण आत्ता मी आधी एक बाई आहे…” आसावरी विषयाला हात घालत बोलते...

हे ऐकताच गौरवीच्या डोळ्यांत पाणी तरळतं…

आसावरी तिच्या समोर बसते… आणि ठामपणे म्हणते...
“गौरवी… तुला घाबरायचं काहीच कारण नाही… कारण घटस्फोट घेणं हा गुन्हा नाही… आणि अन्याय सहन करणं हे कर्तव्य नाही…”

गौरवी हळूहळू सगळं सांगू लागते…
मानसिक छळ…, अपमान…, जातीयवाद… आणि अखेर
त्या अजन्मलेल्या बाळाचा नकार…

आसावरी सर्व शांतपणे ऐकते… आणि मधेमधे नोंदी करते…

सगळं ऐकून झाल्यावर ती फाईल बंद करते… आणि ठाम आवाजात म्हणते...
“ठीक आहे… आता पुढे सगळं मी पाहीन…”

आरव आश्चर्याने विचारतो...
“ताई…?”

आसावरी त्याच्याकडे पाहून म्हणते...
“ही केस फक्त कायद्याचा नाही… हा एका स्त्रीच्या स्वाभिमानाचा आहे…”

ती गौरवीकडे पाहते… आणि पहिल्यांदाच तिच्या आवाजात आश्वासन येतं...
“गौरवी… तुला न्याय मिळेल… आणि तुझ बाळ व त्याचे  भविष्य सुरक्षित राहील… कारण संविधान न्याय मागण्याचा हक्क प्रत्येक स्त्रीला देतो..."

त्या क्षणी गौरवीला जाणवतं... आज पहिल्यांदाच
कुणीतरी तिच्या बाजूने पूर्ण ताकदीने उभं राहिलं होतं…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all